जर तुम्ही सुरक्षित आणि हमी परतावा मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर किसान विकास पत्र (KVP) ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत 115 महिन्यांत (9 वर्षे 7 महिने) गुंतवलेली रक्कम दुप्पट होते. सध्या या योजनेवर 7.5% वार्षिक चक्रवाढ व्याज लागू आहे. त्यामुळे दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर मानली जाते.
KVP खाते उघडण्याचे नियम आणि पात्रता
किसान विकास पत्र योजनेत कोणीही वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तरित्या (कमाल 3 व्यक्ती) खाते उघडू शकतात. तसेच, 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतो
गुंतवणुकीसाठी आवश्यक रक्कम आणि परिपक्वता कालावधी
या योजनेत किमान ₹1000 गुंतवणूक करावी लागते, आणि त्यानंतर ₹100 च्या पटीत रक्कम वाढवता येते. विशेष म्हणजे, कमाल गुंतवणुकीस कोणतीही मर्यादा नाही, त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांसाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. परिपक्वता कालावधी 115 महिने आहे, म्हणजेच सुमारे 9 वर्षे 7 महिने पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम काढता येते.
गुंतवणुकीवर कर्ज आणि तारण सुविधा
KVP खाते तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी वापरता येते. भारतीय रिझर्व्ह बँक, शेड्यूल्ड बँका, सहकारी बँका, सार्वजनिक किंवा खाजगी कंपन्या, स्थानिक संस्था आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडे हे खाते तारण ठेवता येते.
समयपूर्व खाते बंद करण्याची अटी
KVP खाते मुदतपूर्व बंद करायचे असल्यास किमान 2 वर्षे 6 महिने (30 महिने) पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच, खातेधारकाच्या मृत्यूच्या वेळी, न्यायालयाच्या आदेशाने देखील खाते बंद करता येते.
खाते हस्तांतरणाच्या अटी
हे खाते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येते, परंतु ते फक्त ठराविक परिस्थितीतच शक्य आहे. जसे की, खातेधारकाच्या मृत्यूनंतर नामांकित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसास हस्तांतर, संयुक्त खाते असल्यास उर्वरित खातेधारकास हस्तांतर, न्यायालयाच्या आदेशानुसार किंवा खाते तारण ठेवल्यास संबंधित संस्थेकडे हस्तांतर करता येऊ शकते.
KVP खाते कसे उघडावे?
किसान विकास पत्र खाते उघडण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल:
- जवळच्या पोस्ट ऑफिस लां भेट द्या.
- अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा.
- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी कोणताही ओळख पुरावा द्या.
- पत्ता पुरावा (Address Proof) द्या.
- फोटो आणि नामांकन फॉर्म भरून सबमिट करा.
- किमान ₹1000 किंवा त्याहून अधिक रक्कम रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करा.
- खाते उघडल्यानंतर KVP प्रमाणपत्र मिळवा, जे भविष्यात गुंतवणुकीचा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते.
KVP गुंतवणुकीचे फायदे
ही योजना भारत सरकारच्या हमीने संरक्षित असल्यामुळे धोका शून्य आहे. मुद्रास्फीतीच्या प्रभावापासून वाचण्यासाठी ही योजना उपयुक्त पर्याय ठरते. KVP मधील गुंतवणुकीवर करसवलतीचा लाभ मिळत नाही, परंतु त्यातील स्थिरता आणि सुरक्षितता यामुळे ही योजना गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे.
जर तुम्हाला शून्य जोखमीसह तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा असेल, तर किसान विकास पत्र (KVP) 2024 तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना ठरू शकते.