तुम्ही जर रेशन कार्डधारक (Ration Card Holder) असाल आणि दरमहा सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. राज्य सरकारने रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘मिशन सुधार अभियान’ (Mission Sudhar Abhiyan) हाती घेतले आहे. या अंतर्गत आता १० कडक निकषांच्या आधारे रेशन कार्डची तपासणी केली जाणार आहे.
नेमके काय बदलणार?
अनेक सधन नागरिकही गरिबांच्या हक्काचे धान्य उचलत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. हे रोखण्यासाठी सरकारने आता डिजिटल डेटाचा (Digital Data) वापर करून छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने १०० वर्षांवरील लाभार्थी, मृत व्यक्ती आणि सधन कुटुंबांचा शोध घेतला जाईल.
रेशन कार्ड रद्द होण्याचे ‘हे’ आहेत १० प्रमुख निकष:
खालीलपैकी कोणत्याही एका निकषात लाभार्थी बसत असेल, तर त्याचे धान्य बंद होऊ शकते:
१. दुबार रेशन कार्ड: एकाच व्यक्तीचे दोन ठिकाणी नाव असणे.
२. जमीन: कुटुंबाकडे १ हेक्टर (अडीच एकर) पेक्षा जास्त बागायती जमीन असणे.
३. चारचाकी वाहन: कुटुंबाकडे चारचाकी गाडी (Four Wheeler) असणे.
४. उत्पन्न: कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ५९,००० (किंवा ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा) जास्त असणे.
५. कंपनी संचालक: रेशन कार्डमधील सदस्य एखाद्या कंपनीचा संचालक असणे.
६. १०० वर्षांवरील व्यक्ती: कुटुंबात १०० वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती असेल, तर ती जिवंत असल्याची खात्री केली जाईल.
७. सहा महिने धान्य उचलले नाही: मागील ६ महिन्यांत एकदाही रेशन घेतले नसेल.
८. अज्ञान सदस्य: कार्डवर फक्त १८ वर्षांखालील एकच सदस्य असणे.
९. संशयास्पद आधार: आधार कार्ड लिंक नसणे किंवा चुकीचे असणे.
१०. उच्च उत्पन्न गट: प्राप्तिकर भरणारे किंवा सरकारी नोकरीत असणारे सधन नागरिक.
८८ लाख लाभार्थी रडारवर!
राज्यातील सुमारे ८८ लाख लाभार्थी या तपासणीच्या रडारवर आहे.
त्यामुळे जर तुम्ही खरोखर गरजू असाल, तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. पण जर तुम्ही या १० निकषांत बसत नसाल, तर तुमचे रेशन लवकरच बंद होऊ शकते.
टीप: ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या ओळखीच्या सर्व रेशन कार्डधारकांना हा मेसेज शेअर करा, जेणेकरून त्यांना या नवीन नियमांची माहिती मिळेल.