सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने दहा वर्षाखालील मुलींसाठी सुरू केलेली एक विशेष बचत योजना आहे, जी मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी आर्थिक स्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. आजच्या काळात महागाई आणि भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेता, मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक तरतूद करणे हे पालकांसमोर एक मोठे आव्हान ठरते. या योजनेमुळे पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी निश्चित आणि उच्च परतावा मिळविण्याची संधी मिळते.
खाते उघडण्या साठी कोण पात्र आहे ?
या योजनेचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सहज उघडता येते. 10 वर्षांखालील मुलींचे पालक किंवा कायदेशीर किंवा कायदेशीर पालक हे खाते उघडू शकतात. एका कुटुंबात दोन मुलींसाठीच खाते उघडण्याची परवानगी असली, तरी जुळ्या किंवा दिल्या मुली असल्यास त्यांनाही खाते उघडता येते.
खाते केवळ 250 रुपयांनी उघडता येते-
खातं उघडण्यासाठी फक्त ₹250 इतकी अल्प रक्कम भरावी लागते, तर एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ₹1.5 लाख इतकी रक्कम जमा करता येते. ही रक्कम एकाच वेळी किंवा हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा आहे.
8.2% चक्रवाढ व्याजदर
या योजनेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे मिळणारा व्याजदर, जो सध्या 8.2% इतका चक्रवाढ व्याजदर आहे. हा व्याजदर इतर बचत योजनांच्या तुलनेत खूप अधिक आहे. सरकार प्रत्येक तिमाहीला हा व्याजदर जाहीर करत असल्याने भविष्यातील गुंतवणुकीसाठी हा एक स्थिर आणि सुरक्षित पर्याय ठरतो. व्याजाच्या रकमेसह संपूर्ण दीड लाखापर्यंतची गुंतवणूक करमुक्त असल्यामुळे कर बचतीचाही मोठा लाभ मिळतो.
पैसे कधी काढता येतात?
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 10वी उत्तीर्ण झाल्यास शिक्षणाच्या उद्देशाने तिच्या खात्यातील 50% रक्कम काढण्याची परवानगी दिली जाते. खाते उघडल्यापासून 21 वर्षांनंतर किंवा अठरा वर्ष वयानंतर मुलीचे लग्न झाल्यास लग्नाच्या वेळेस खाते बंद करता येते.पण लग्नाच्या 1 महिन्यापूर्वी किंवा 3 महिन्यांनंतर बंद करता येणार नाही.
असे मिळतील 55 लाख रुपये:-
जर मुलीचे वय एक वर्ष असेल आणि सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹9,000 जमा केले तर सध्याच्या 8.2% चक्रवाढ व्याजाने 21 वर्षांनी अंदाजे ₹55 लाख मिळू शकतात. या योजनेचा सध्याचा व्याजदर 8.2% असून, व्याज दर तिमाहीनुसार बदलू शकतो. करमुक्त व्याज आणि दीर्घकालीन बचतीमुळे ही योजना मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी आदर्श पर्याय आहे. पालकांनी या योजनेचा विचार करून मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य मिळवावे.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे:
- उच्च व्याजदर:
सध्या या योजनेचा व्याजदर 8.2% आहे, जो इतर बचत योजनांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. - कर सवलत:
या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. गुंतवणूक आणि व्याज दोन्हीवर कर सवलत आहे. - मुलींच्या भविष्यासाठी सुरक्षितता:
ही योजना मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक सुरक्षितता प्रदान करते.
सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या आर्थिक भविष्याची हमी देणारी एक उत्तम गुंतवणूक योजना आहे. ज्या पालकांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक तरतूद करायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना खूपच फायदेशीर आहे. उच्च व्याजदर, करमुक्ती, आणि खात्रीशीर परतावा या सुविधांमुळे अनेक कुटुंबे या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे जर तुम्हीही तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सुकन्या समृद्धी योजना हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.
अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.